अजित पवारांनी पुन्हा या ठिकाणी दिली पहाटे भेट !

राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार एक लहरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात .अजित पवार वेळेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असतात .याचाच अनुभव आज पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आला. भल्या पहाटे म्हणजे पावणे सहा वाजता आज पवारांनी पुणे स्टेशन येथील मेट्रो कामाची पाहणी केली.गेल्या आठवड्यातदेखील अजित पवारांनी पहाटे ६ वाजता अशीच भेट पिंपरी चिंचवड येथे मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती.
ज्याप्रमाणे अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे पोहचले होते तसेच ते पुण्यामध्येही पोहचले. अजित पवार यांनी पहाटे दिलेल्या या धक्कातंत्रामुळे आधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाली.त्या ठिकाणी अजित पवारांनी मेट्रोच्या कामाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांना यांना अजित पवारांनी आवश्यक त्या सूचना केल्या.
कोरोनाच्या महामारीमुळे कामगार आपापल्या गावी परतल्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम झाला होता. आता कामगार परत येत असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये मेट्रोची सेवा वेळेत देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे .