अजित पवारांनीच शरद पवारांचा गेम केला म्हणत निलेश राणेंची शिवसेनेवर टीका !

0 158

संपूर्ण देशाला माहित आहे की निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पहाटे शपथविधी केला होता. याच पहाटेच्या शपथविधीवरून शिवसेनेनं पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला टोमणे मारले आहेत. या टोमण्यांना प्रतिउत्तर देताना निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे .

निलेश राणे यांनी ट्विट करून म्हटले आहे – शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार हे पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला,” असे आशयाचे ट्विट करतं निलेश राणेंनी अजित पवार यांनी केलेल्या राजकीय बंडाची आठवण करून दिली आहे .

Related Posts
1 of 546

शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांसह पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता.मुख्यमंत्री पदासाठी बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्याचा उपयोग झाला नाही आणि फडणवीसांचे सरकार कोसळले ! असं म्हणत शिवसेनेने काही पोलीस अधिकाऱ्यांना टोला लगावला होता , यावर निलेश राणेंनी आता प्रत्युउत्तर दिले आहे .

Leave a comment
error: Content is protected !!
%d bloggers like this: