अखेर रुग्णाच्या भावावर गुन्हा दाखल


अहमदनगर : जिल्हा रुग्णालयात पासशिवाय आणि मास्क शिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता युद्धात वर्तणूक करून आरडाओरड केल्याप्रकरणी कोरोनाबाधित रुग्णाच्या भावावरती तोफखाना पोलिसांनी भादवि १८६,१८८,२६९ अन्व्ये गुन्हा दाखल केला असून आरोपीचे नाव सुदर्शन पालवे ,राहणार सावेडी आहे . जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे जिल्हा रुग्णालयात विझिटला गेले असता वॉर्ड क्र ११ मध्ये आरोपी विनमस्क फिरताना पाहून विचारपूस करून बाहेर जाण्यास सांगितले असता उद्धट भाषा वापरून जिल्हाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला .