अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येचा निषेध

अहमदनगर – उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला.
तर सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, माणुसकीला काळिमा फासणार्या या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आपल्या आईसोबत तरुणी शेतात चारा गोळा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून, पाठीच्या कण्याचे हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगढच्या जेएन मेडिकल रुग्णालय व सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या पीडित तरुणीची प्राणज्योत माळवली. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. यापुढे जाऊन पोलिसांनी पीडितेचा मृतदेहावर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार केले. उत्तर प्रदेश पोलीसांनी आपली कामगिरी चोखपणे निभावली नसल्याचा व या घटनेचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणाचा सीबीआयकडे सोपवण्यात यावा, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा उपाध्यक्ष तालेवर गोहेर, विजय छजलानी, आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, राहुल लखन, अॅड.सिध्दार्थ सोलंकी, नरेंद्र तांबोली, मनोज बिडलान, विक्की करोलिया, अनिल मट्टू, संतोष सारसर, मंगेश मोकळ, सुरज जंगारे, नईम सरदार, अमोल छजलाने, धरीज कंडारे, अनिल वाणे, उमेश गोहेर, प्रमोद चौहान, धीरज बैद आदि उपस्थित होते.