अकोले येथे नवीन कोविड सेंटर उभारावे- वैभव पिचड

अहमदनगर – सध्या देशात व राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आदिवासी भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे .त्यामुळे शासनाने अकोले येथे दोन कोविड सेंटर सुरू केले आहे परंतु हे दोन्ही कोळी सेंटर कमी पडत असल्याने नवीन कोळी सेंटर उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने नवीन कोविड सेंटर उभारावे असे निवेदन आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की काही दाते व स्वयंसेवी संस्था पुढे येऊन कोविड सेंटर उभारण्यासाठी मनोदय व्यक्त करत आहे परंतु अशा कोविड सेंटरला डॉक्टरांची उपलब्धता आणि औषधोपचार शासनाने उपलब्ध करून द्यावे असे ते म्हणाले .रुग्णांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय डॉक्टरांना परिपूर्ण पीपीई कीट देणे गरजेचे आहे.
यापूर्वी शासनाकडून दिले पीपीई किट अपूर्ण असून त्यामुळे डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून पीपीई किट देण्यासोबतच राजूर येथे आदिवासी भागांसाठी नवीन कोविड सेंटर सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश करावेत अशी आग्रही विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.