अंतिम वर्षाची परीक्षा एक तास आणि ५० गुणांची

मुंबई- काल झालेल्या राज्यपाल आणि कुलगुरू यांच्या बैठकीनंतर अंतिम वर्षाची परीक्षा हे एक तास आणि ५० गुण असणार अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच सर्व विद्यापीठांनी परीक्षा प्रक्रिया आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया े 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी असे आदेश त्यांनी दिले आहेत. ही परीक्षा विद्यार्थ्यांना घरी बसून सुद्धा देता येईल त्यासाठी सर्व विद्यापीठांना तीन पर्याय देण्यात आले आहे त्यापैकी कोणताही एक पर्याय विद्यापीठ स्वीकारू शकते.
ते तीन पर्याय असे आहे ओपन बुक दुसरा दुसरा पर्याय m.c.q. (एम सी क्यू) तिसरा पर्याय असाइनमेंट बेस्ट आहे यापैकी कोणताही एक पर्याय विद्यापीठ स्वीकारू शकते.जे अहवाल कुलगुरू समितीकडून सादर करण्यात आला होता. ते अव्हाल प्रत्येक विद्यापीठांना पाठविला आहे.
अहवालानुसार प्रत्येक विद्यापीठाने निर्णय घेऊन त्याची माहिती काढावी अशा देश सुद्धा त्यांनी दिला. या संबंधित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे अशी माहिती ही उदय सामंत यांनी दिली.